निवडणूक आयोगाचा वापर घरगड्या सारखा… उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर घणाघात

| Updated on: May 20, 2024 | 5:30 PM

उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर आणि मोदी सरकारवर घणाघात केला. उद्धव ठाकरे म्हणाले, मोदी सरकार त्यांच्या पराभवाच्या भीतीने निवडणूक आयोगाचा वापर घरगड्या सारखा करतोय. निवडणूक आयोग पक्षपातीपणा करतोय, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला.

उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या मतदानाचा शेवटचा टप्पा पुढच्या एक-दीड तासांमध्ये थांबणार असताना पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी आपला संताप व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले. उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर आणि मोदी सरकारवर घणाघात केला. उद्धव ठाकरे म्हणाले, मोदी सरकार त्यांच्या पराभवाच्या भीतीने निवडणूक आयोगाचा वापर घरगड्या सारखा करतोय. निवडणूक आयोग पक्षपातीपणा करतोय, असा हल्लाबोल देखील उद्धव ठाकरे यांनी केला. पुढे ते असेही म्हणाले, दफ्तर दिरंगाई ज्याला म्हणतात तशी दिरंगाई मतं नोंदवताना केली जात आहे. मी नागरिकांना आवाहन करतोय, आता थोडा वेळ जरी राहिला असला तरी तुमच्या मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहू नका. आपण मतदानकेंद्रांमध्ये जावून उभे राहा आणि जे निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी आहेत त्यांना पहाटे पाच वाजेपर्यंत सोडू नका. तुमचं मतदान केल्याशिवाय सोडू नका. तुमच्या मतदानाचा हक्क बजावल्याशिवाय बाहेर पडू नका, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी मतदारांना केले.

Published on: May 20, 2024 05:30 PM
ऐ थांब जरा…. राज ठाकरे चिडले अन् माध्यमांवर भडकले, पण का?
मुंबईकरांसाठी मोठी बातमी… मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, सकाळीच प्रवाशांना मनस्ताप, कुठं बिघाड?