महाराष्ट्रात कुणाचा जोर? प्रचाराच्या रणनितीदरम्यान भाजपच्या अंगलट काय आलं? विश्लेषक संजीव उन्हाळेंचं भाकीत काय?

| Updated on: Jun 01, 2024 | 6:28 PM

आज देशात निवडणुकीच्या सातव्या टप्प्याचं मतदान पार पडलं. मतदान संपल्यानंतर एक्झिट पोलचे आकडे जाहीर होण्यास सुरूवात झाली आहे. त्याकडे सगळ्या देशाच लक्ष लागलं आहे. तर लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राचा निकाल महत्त्वाचा ठरणार आहे. अशातच प्रसिद्ध राजकीय विश्लेषक संजीव उन्हाळे यांनी भाकित केलं आहे.

शिवसेना आणि राष्ट्रवादी या पक्षात उभी फूट पडल्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरणच बदलून गेल्याचे पाहायला मिळाले. या राजकीय घडामोडीनंतर यंदाच्या लोकसभा निवडणुकीवर सर्वांचं लक्ष लागलं आहे. आज देशात निवडणुकीच्या सातव्या टप्प्याचं मतदान पार पडलं. मतदान संपल्यानंतर एक्झिट पोलचे आकडे जाहीर होण्यास सुरूवात झाली आहे. त्याकडे सगळ्या देशाच लक्ष लागलं आहे. तर लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राचा निकाल महत्त्वाचा ठरणार आहे. अशातच प्रसिद्ध राजकीय विश्लेषक संजीव उन्हाळे यांनी महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर भाष्य केले आहे. महाराष्ट्रात कुणाचा जोर? कोणाला किती जागा मिळणार? याचा अंदाज वर्तविला आहे. ‘महाराष्ट्रातील लोकभावना आघाडीच्या बाजूने आहे. पण ऐन निवडणुकीत काही मतदारसंघात त्यांनी जे कार्यक्रम केले, त्यामुळे काही बदल होऊ शकतो. ज्या ठिकाणी आघाडीचा उमेदवार वीक तिथे महायुतीला जागा मिळू शकतात. 2014, 2019 मध्ये भाजपाचा एक मतदार तयार झाला, हे मान्य केलं पाहिजे’, असे त्यांनी म्हटले आहे.

Published on: Jun 01, 2024 06:28 PM
पण ‘मनसे’ने दिलसे काम केलं नाही, राजकीय विश्लेषक अनिल थत्ते यांचं नेमकं मत काय?
Lok sabha Election Exit Poll 2024 : देशात मोदी गॅरंटी चालली की नाही? विजय चोरमारे काय म्हणाले?