Loksabha Election Exit Poll 2024 : राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया, सिद्धू मूसेवाल्याच्या गाण्याचा उल्लेख करत भाजपवर निशाणा

| Updated on: Jun 02, 2024 | 5:09 PM

टीव्ही 9 पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदींची हॅट्रिक होणार असून एनडीएला ३३७ जागा तर इंडिया आघाडीला १७० जागा मिळणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबत काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी एक्झिट पोलवर प्रश्न उपस्थित केला आहे.

टीव्ही 9 पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, देशात पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींची सत्ता येणार आहे तर महाराष्ट्रात महाविकास आघाडीला सर्वाधिक जागा २५ जागा मिळणार आहे. दरम्यान, टीव्ही 9 पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदींची हॅट्रिक होणार असून एनडीएला ३३७ जागा तर इंडिया आघाडीला १७० जागा मिळणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबत काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी एक्झिट पोलवर प्रश्न उपस्थित केला आहे. इतकंच नाही तर हा एक्झिट पोल खोटा असल्याचेही राहुल गांधी म्हटले आहे. रविवारी पक्षाच्या नेत्यांच्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना राहुल गांधी म्हणाले, ‘हा एक्झिट पोल नाही, हा मोदींचा मीडिया पोल आहे. हा त्यांचा फँटसी पोल असल्याचे म्हणत खोचक टीका राहुल गांधी यांनी केली आहे. दरम्यान, इंडिया आघाडीच्या किता जागा येतील असा सवाल माध्यमांच्या प्रतिनिधींनी केला असता, त्यांनी माध्यमांच्याच प्रतिनिधींची फिरकी घेतली आणि म्हणाले, ‘तुम्ही सिद्धू मूसेवालाचे गाणे २९५ ऐकले आहे का?’

Published on: Jun 02, 2024 05:09 PM
पुण्यात चाललंय काय? पोलीस कर्मचाऱ्याचा अजब प्रताप, पोलिसांनी तरुणाकडून स्वत:चे पाय दाबून घेतले
‘अन्यथा मी स्वत:ला संपवून टाकेन’, बजरंग सोनवणे निवडणूक अधिकाऱ्यावर भडकले