2024 च्या आखाड्यात 2019 च्या निकालावरुन खडाजंगी, कुणी कुणाच्या जागा पाडल्या?
2019 ला मतविभाजनामुळे वंचितचा भाजपला 8 जागांवर फायदा झाल्याचा प्रश्न आंबेडकरांना केला गेला., यावर काँग्रेस-राष्ट्रवादीमुळेच त्या 8 जागांवर वंचितचा पराभव झाल्याचा दावा आंबेडकरांनी केलाय. गेल्यावेळी लोकसभेत आघाडी न झाल्यामुळे वंचितचा फायदा भाजपला झाल्याचा प्रश्न प्रकाश आंबेडकरांना केला गेला.
2024 च्या आखाड्यात 2019 च्या निकालावरुन वाद-प्रतिवाद सुरु आहे. 2019 ला मतविभाजनामुळे वंचितचा भाजपला 8 जागांवर फायदा झाल्याचा प्रश्न आंबेडकरांना केला गेला., यावर काँग्रेस-राष्ट्रवादीमुळेच त्या 8 जागांवर वंचितचा पराभव झाल्याचा दावा आंबेडकरांनी केलाय. गेल्यावेळी लोकसभेत आघाडी न झाल्यामुळे वंचितचा फायदा भाजपला झाल्याचा प्रश्न प्रकाश आंबेडकरांना केला गेला. त्यावर वंचितने नव्हे तर काँग्रेस-राष्ट्रवादीनंच आमच्या जागा पाडल्याचं उत्तर आंबेडकरांनी दिलं. 2019 च्या लोकसभेत कोणत्या जागा काँग्रेस वा राष्ट्रवादीच्या पराभूत झाल्या. वंचितचा त्या जागांवर काय रोल होता. पाहा स्पेशल रिपोर्ट. दरम्यान, अनेक विधानसभांमध्ये वंचित फॅक्टर महत्वाचा ठरला होता. ज्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीचं नुकसान होऊन भाजपला फायदा झाला. मात्र कुणामुळे कोण पराभूत झालं, यावरुन वाद सुरु आहेत. शिंदेंच्या शिवसेनेचे संजय शिरसाट म्हणतायत की वंचित स्वतंत्र लढल्यास त्याचा फायदा महायुतीला होणार. तर दुसरीकडे मत विभाजनावरुन वंचित आणि काँग्रेसनं एकमेकांकडे बोट दाखवलंय. यावेळी वंचितनं मविआला सुरुवातीला 27 जागांचा प्रस्ताव दिला होता. नंतर तो प्रस्ताव आहे की मागणी यावरुन बराच खल रंगला.