Modi 3.0 : नरेंद्र मोदीच होणार PM; नितीश-चंद्राबाबू NDA सोबत, पंतप्रधान पदावर शिक्कामोर्तब

| Updated on: Jun 06, 2024 | 11:09 AM

इंडिया आघाडीने जे काही दावे केले होते. ते दावे तुर्तासतरी फोल ठरताना दिसताय. नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांनी NDA सोबत राहण्याचा निर्णय घेतला त्यामुळे नरेंद्र मोदीच तिसऱ्यांचा पंतप्रधान होणार असल्याचे स्पष्ट झालं आहे. इंडिया आघाडीच्या नजरा असलेल्या नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांनी थेट एनडीएच्या बैठकीलाच हजेरी लावली. आणि एनडीचा नेता म्हणून नरेंद्र मोदी यांनाच पसंती दिली.

Follow us on

एनडीएने २९४ जागा जिंकल्यानंतर इंडिया आघाडीने जे काही दावे केले होते. ते दावे तुर्तासतरी फोल ठरताना दिसताय. नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांनी NDA सोबत राहण्याचा निर्णय घेतला त्यामुळे नरेंद्र मोदीच तिसऱ्यांचा पंतप्रधान होणार असल्याचे स्पष्ट झालं आहे. एनडीएला बहुमत मिळाल्यानंतर आणि इंडिया आघाडी जवळ जर तरचे पर्याय सुरू झाल्यानंतर दिल्लीत दोन बैठका झाल्यात. मोदींच्या उपस्थितीत झालेल्या १८ मित्र पक्षांनी हजेरी लावली आणि मोदींच्या नेतृत्वावरच विश्वास ठेवला आणि तसा प्रस्तावही पास करण्यात आला विशेष म्हणजे इंडिया आघाडीच्या नजरा असलेल्या नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांनी थेट एनडीएच्या बैठकीलाच हजेरी लावली. आणि एनडीचा नेता म्हणून नरेंद्र मोदी यांनाच पसंती दिली. तर दुसरीकडे मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडेही इंडिया आघाडीची बैठक झाली नेमकं काय झालं बैठकीत ? … बघा स्पेशल रिपोर्ट…