Saamana Editorial On BJP : अन् त्यांचा अहंकाराचा गाडा रोखला, ‘सामना’तून मोदी आणि भाजपवर हल्लाबोल

| Updated on: Jun 05, 2024 | 1:45 PM

नरेंद्र मोदी यांचा 'चारशेपारं'चा नारा सुकलेल्या पाचोळ्यासारखा उडून गेला. लोक सार्वभौम आहेत. लोकशाहीचे संरक्षणकर्ते शेवटी लोकच असतात हे भारताने दाखवून दिले. चारशे जागा निवडून द्या. नव्हे, चारशे जागा निवडून आणणारच या अहंकारास शेवटी भारतीय जनतेने पायदळी तुडवले, असल्याचे म्हणत सामनातून हल्लाबोल करण्यात आलाय.

लोकसभा निवडणुकीचा निकाल समोर आला. या निकालात एनडीएला बहुमत मिळाले असले भाजपला मोठा फटका बसल्याचे पाहायला मिळाले. या निकालाच्या पार्श्वभूमीवर आणि इंडिया आघाडी महाविकास आघाडीच्या यशावर सामना या ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या मुखपत्रातून पतंप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अमित शाह आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल करण्यात आलाय. देशाच्या जनतेने अहंकारी मोदी आणि त्यांच्या अमित शहांना निरोप दिला आहे. त्यांच्या अहंकाराचा गाडा रोखला आहे, असं म्हणत त्यांना डिवचण्यात आलंय. तर नरेंद्र मोदी यांचा ‘चारशेपारं’चा नारा सुकलेल्या पाचोळ्यासारखा उडून गेला. लोक सार्वभौम आहेत. लोकशाहीचे संरक्षणकर्ते शेवटी लोकच असतात हे भारताने दाखवून दिले. चारशे जागा निवडून द्या. नव्हे, चारशे जागा निवडून आणणारच या अहंकारास शेवटी भारतीय जनतेने पायदळी तुडवले, असल्याचे म्हणत सामनातून हल्लाबोल करण्यात आलाय. ‘सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजप नक्कीच पुढे आला, पण त्यांच्या एनडीएचे बहुमत हे टेकूवरचे आहे व ते टेकूही डळमळीत आहेत. सत्ता टिकविण्यासाठी पुन्हा भ्रष्ट मार्गाचा, फोडाफोडीचा मार्ग स्वीकारला तर लोकांचा उद्रेक रस्त्यावर येईल. देशातील लोकशाहीचा अफाट, अपूर्व, अलौकिक विजय झाला आहे. देशाच्या जीवनातील हा सर्वोच्च आनंदाचा क्षण आहे, तो तसाच राहील, असा विश्वासही सामना या वृत्तपत्रातील अग्रलेखातून व्यक्त करण्यात आलाय.

Published on: Jun 05, 2024 12:50 PM
प्रचारात 400 पारची दणक्यात घोषणा पण भाजप 250 च्या आत, ‘इंडिया’नं मोदींना कुठं रोखलं?
Bachchu Kadu on Navneet Rana : तर नवनीत राणा जिंकल्या असत्या, बच्चू कडू यांनी सांगितलं पराभवाचं कारण