भाजपला योगींचाही राजीनामा घ्यायचाय; संजय राऊत यांचा मोठा गौप्यस्फोट
जसं नरेंद्र मोदींना मोकळं केलं आहे. देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या वरिष्ठांनी अशाप्रकारची भूमिका घेण्यास सांगितले आहे. कारण भाजपला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा राजीनामा घ्यायचा आहे, असं वक्तव्य करत संजय राऊत यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.
आपल्या पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने आपल्याला उपमुख्यमंत्रीपदाच्या जबाबदारीतून मुक्त करावं, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आणि त्यांनी आपल्या राजीनाम्याची इच्छा व्यक्त केली. यावरच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठा दावा केला आहे. विधानसभा, महापालिका निवडणुकीत जनता तुम्हाला मोकळे करणार आहे, असं म्हणत संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोचरी टीकाही केली आहे. तर लोकशाहीमध्ये जनता मोकळं करत असते. जसं नरेंद्र मोदींना मोकळं केलं आहे. देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या वरिष्ठांनी अशाप्रकारची भूमिका घेण्यास सांगितले आहे. कारण भाजपला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा राजीनामा घ्यायचा आहे, असं वक्तव्य करत संजय राऊत यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. तर अशी नौटंकी करण्याची सवय भाजप नेत्यांना असल्याचे म्हणत संजय राऊतांनी भाजपला एकप्रकारे डिवचल्याचे पाहायला मिळत आहे. ज्या राज्यात भाजपच्या जागा कमी झाल्यात तिथल्या नेतृत्वाने राजीनामा द्यावा, हे केंद्राने देवेंद्र फडणवीस यांना सांगितलं आहे आणि याच आधारावर भाजपला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा राजीनामा घ्यायचा असल्याचे राऊतांनी म्हटले आहे.