‘इंडिया आघाडी’कडून नितीश कुमार यांना ‘ही’ मोठी ऑफर? शरद पवारांचा थेट फोन, काय झाली चर्चा?
इंडिया आघाडी सोडून गेलेल्या एका बड्या नेत्याला शरद पवार यांनी फोन करून थेट उप पंतप्रधान पदाची ऑफर दिल्याची माहिती मिळत आहे. सध्या दिसत असलेल्या कलातील आकड्यांनुसार, शरद पवार पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहे.
लोकसभा निवडणुकीचे कल हाती येत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपची ‘अब की बार, 400 पार’ ही मोठी घोषणा आतापर्यंत आलेल्या आकड्यावरून पुरती फोल ठरल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच एनडीएला 300 जागा गाठणं कठीण झाले आहे. तर, इंडिया आघाडीला 240 पेक्षा अधिक जागा मिळण्याचे संकेत दिसताय. अशी परिस्थिती असताना इंडिया आघाडी सोडून गेलेल्या एका बड्या नेत्याला शरद पवार यांनी फोन करून थेट उप पंतप्रधान पदाची ऑफर दिल्याची माहिती मिळत आहे. सध्या दिसत असलेल्या कलातील आकड्यांनुसार, शरद पवार पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहे. शरद पवार यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना फोन केला आहे. इंडिया आघाडीच्या बाजूने त्यांनी परत यावे यासाठी फोन केला असल्याची चर्चा आहे. इतकंच नाहीतर इंडिया आघाडीचे सरकार आल्यास उप पंतप्रधान पद देण्याचीही ऑफर पवार यांनी नितीशकुमार यांना दिली असल्याचेही सांगितले जात आहे.