Lok Sabha Election Result 2024 : निकालात देशाचे आकडे रंजक स्थितीत अन् शेअर बाजार धाडकन कोसळला

| Updated on: Jun 04, 2024 | 10:13 AM

लोकसभा निवडणुकीच्या सुरुवातीच्या ट्रेंडचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून आला आहे. स्टॉक एक्सचेंजचे सर्व प्रमुख बेंचमार्क निर्देशांक घसरले. मंगळवारी (4 जून) NSE निफ्टी 650 अंकांनी, सेन्सेक्स 2200 अंकांनी घसरला. लोकसभा निकालापूर्वीच शेअर बाजारावर त्याचा परिणाम पाहायला मिळाला.

Follow us on

सोमवारी शेअर बाजारात जोरदार तेजी असल्याचे पाहायला मिळाले होते. तर आज शेअर बाजारात तेजीचे वातावरण असेल अशी शक्यता वर्तविली जात असताना शेअर बाजार 2200 अंकांनी धाडकन कोसळल्याचे पाहायला मिळाले. लोकसभा निवडणुकीच्या सुरुवातीच्या ट्रेंडचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून आला आहे. स्टॉक एक्सचेंजचे सर्व प्रमुख बेंचमार्क निर्देशांक घसरले. मंगळवारी (4 जून) NSE निफ्टी 650 अंकांनी, सेन्सेक्स 2200 अंकांनी घसरला. निफ्टी बँकही 1800 हून अधिक अंकांनी घसरल्याचे पाहायला मिळाले तर सेन्सेक्स 74 हजाप 267 वर तर निफ्टी 22 हजार 600 च्या आसपास आहे. देशात गेल्या दोन महिन्यांपासून लोकसभा निवडणुकीचा मोठा उत्सव सुरु आहे. तर आज सकाळी 8 वाजेपासून देशभरात लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु झाली आहे. अनेक ठिकाणी काही उमेदवार आघाडीवर आहेत. तर काही दिग्गज नेत्यांना अजून ही मुसंडी मारता आलेली नाही. मात्र या निकालापूर्वीच शेअर बाजारावर त्याचा परिणाम पाहायला मिळाला.