Mahadev Jankar यांच्याकडून स्वबळाचा नारा! महाराष्ट्रात 534 जागा लढणार? नेमकं काय म्हणाले?

| Updated on: Aug 29, 2023 | 9:19 PM

VIDEO | राष्ट्रीय समाज समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी बारामती लोकसभा लढविण्याचे दिले संकेत दिले, देशभर जनस्वराज्य यात्रा काढून ५४३ लोकसभा मतदारसंघात पक्ष निवडणूक लढणार आहे,महादेव जानकर यांनी दिला स्वबळाचा नारा

बारामती, २९ ऑगस्ट २०२३ | राष्ट्रीय समाज समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी बारामती लोकसभा लढविण्याचे संकेत दिले आहेत. देशभर जनस्वराज्य यात्रा काढून ५४३ लोकसभा मतदारसंघात पक्ष निवडणूक लढणार आहे. भाजप आणि काँग्रेसमध्ये मी भेद करत नाही तर काँग्रेस सत्तेत असतानाही त्यांनी मित्र पक्षांचे असेच हाल केले असल्याचे महादेव जानकर यांनी म्हटले. भाजपही सत्तेत आल्यावर असंच करणार असल्याचा दावा करत महादेव जानकर म्हणाले, ‘भाजप आणि काँग्रेसवर नाराज न राहता आपली ताकद वाढवली पाहिजे. रासप पक्ष मोठा झाला पाहिजे. त्यासाठी आम्ही जनस्वराज्य यात्रा काढली.’ ते पुढे असेही म्हणाले की, ‘आम्ही सध्या स्वबळावर ५४३ जागा लोकसभा लढणार. मी महाराष्ट्र परभणी माढा आणि बारामती या मधील एका ठिकाणमधून लोकसभा लढणार असून महाराष्ट्रात भारतात सरकार आणण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. आम्ही कोणासोबत जाणार नाही, एनडीए किंवा इंडिया सोबत नाही. तर ४८ महाराष्ट्रात जागा लढणार जिंकणार’, असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Published on: Aug 29, 2023 09:16 PM
‘Sachin Tendulkar ने भारतरत्न परत करावा, भारतरत्न परत दिला नाही, तर…’, बच्चू कडू यांनी काय दिला इशारा?
VijayKumar Gavit यांचं महिला आयोगाच्या नोटीसला उत्तर, केली दिलगिरी व्यक्त अन् म्हणाले….