उद्धव ठाकरे नंबर एकचे नालायक तर आदित्य ठाकरेंची लायकी काय?, भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल

| Updated on: Apr 21, 2024 | 1:30 PM

'नालायक लोकांचं सर्वेक्षण केलं तर सर्वात टॉपवर आणि पहिल्या नंबरवर निष्क्रीय आणि नापसंत मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे दिसतील. उद्धव ठाकरे यांचा कार्यकाळ माहिती असेलच, अडीच वर्ष खिशात पेन नसताना मुख्यमंत्री, अडीच वर्ष विधानसभेत दोनदाच आलेला मुख्यमंत्री...'

देवेंद्र फडणवीसांनी आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करून दिल्ली जाण्याचा शब्द दिला होता. मात्र तो पाळला नाही, असा दावा उद्धव ठाकरेंनी केला. त्याला भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आलंय. फडणवीसांनी हा दावा फेटाळला आणि आता चंद्रशेखर बावनकुळे यांनीही ठाकरेंवर निशाणा साधला. देशातील १४ कोटी जनतेचं जगातील कोणत्याही एजन्सीमार्फत सर्वेक्षण केलं तर या महाराष्ट्राच्या लायक व्यक्तीच्या यादीत टॉपवर आणि क्रमांक एकवर देवेंद्र फडणवीस असतील असा विश्वास चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. जनतेच्या मनात मुख्यमंत्री म्हणून संवेदनशील नेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांचं नाव असल्याचे चंद्रशेखर बावनकुळेंनी म्हटले तर यासोबत दुसरं नालायक लोकांचं सर्वेक्षण केलं तर सर्वात टॉपवर आणि पहिल्या नंबरवर निष्क्रीय आणि नापसंत मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे दिसतील. उद्धव ठाकरे यांचा कार्यकाळ माहिती असेलच, अडीच वर्ष खिशात पेन नसताना मुख्यमंत्री, अडीच वर्ष विधानसभेत दोनदाच आलेला मुख्यमंत्री… असा कार्यकाळ त्यांचा जनतेने पाहिला आहे. त्यामुळे नापसंत आणि निष्क्रीय मुख्यमंत्री असल्याचे म्हणत ते मनोरूग्णासारखे वागताय त्यांची मानसिक स्थिती ढासळली आहे, असे म्हणत चंद्रशेखर बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केलाय. तर आदित्य ठाकरेंना कुणी मुख्यमंत्री काय मंत्रीही कुणी केलं नसतं, आदित्य ठाकरेंची लायकी काय? असा सवाल करत त्यांनी आदित्य ठाकरेंची लायकी काढलीये.

Published on: Apr 21, 2024 01:30 PM
धनगर आरक्षणास मोठा झटका, सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली अन्…
मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरेंची साथ सोडणार? महायुतीची मोठी ऑफर काय?