भाजपच्या मिहीर कोटेचांवर पैसे वाटल्याचा आरोप, शिवसैनिकांवर कारवाई अन् उद्धव ठाकरेंचा कडक इशारा
शुक्रवारी रात्री दादरच्या शिवाजीपार्कमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत सभा जेमतेम संपली होती. त्याचवेळी मुलूंडमध्ये मिहीर कोटेचा यांच्या कार्यालयात पैशांचा खेळ सुरू असल्याचा आरोप ठाकरे गटाने केला. मिहीर कोटेचा यांच्या कार्यालयाबाहेर ठाकरे गटाने राडा केला त्यानंतर भाजपचे कार्यकर्तेही एकवटले आणि घोषणाबाजी केली
उत्तर पूर्व मुंबईतील भाजपचे उमेदवार मिहीर कोटेचा यांनी पैसे वाटल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे. नुसता आरोपच नाहीतर मिहीर कोटेचा यांच्या कार्यालयाबाहेर राडाही केलाय. पोलिसांनी काही शिवसैनिक आंदोलकांना ताब्यात घेतलं. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पोलिसांनाच थेट इशारा दिला आहे. शुक्रवारी रात्री दादरच्या शिवाजीपार्कमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत सभा जेमतेम संपली होती. त्याचवेळी मुलूंडमध्ये मिहीर कोटेचा यांच्या कार्यालयात पैशांचा खेळ सुरू असल्याचा आरोप ठाकरे गटाने केला. मिहीर कोटेचा यांच्या कार्यालयाबाहेर ठाकरे गटाने राडा केला त्यानंतर भाजपचे कार्यकर्तेही एकवटले आणि घोषणाबाजी केली. मुलूंडमध्ये दोन्ही पक्षांचे कायकर्ते एकत्र आल्यानंतर तणाव निर्माण झाला. त्याचवेळी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कोटेचा यांच्या कार्यालयाला भेट दिली. आणि नंतर ते निघाले… बघा स्पेशल रिपोर्ट