महाराष्ट्रात भाजपला फटका बसणार, लोकसभा निकालाआधीच कुणाचं रोखठोख भाकीत?

| Updated on: Jun 02, 2024 | 2:26 PM

निकालाआधी एक्झिट पोलचा अंदाज समोर आला आहे. काही राजकीय विश्लेषकांनी देखील आपले आपले अंदाज वर्तविले आहे. अशातच टीव्ही 9 पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलच्या अंदाज समोर आला आहे. त्यानुसार, महाराष्ट्रात महायुतीला मोठा फटका बसणार आहे. महाराष्ट्रात तर महायुतीला 22 जागा तर महाविकास आघाडीला सर्वाधिक 25 जागांवर यश मिळण्याचा अंदाज आहे.

लोकसभा निवडणुकीच्या निकालाला अवघे दोन दिवस बाकी असताना निकालाआधी एक्झिट पोलचा अंदाज समोर आला आहे. काही राजकीय विश्लेषकांनी देखील आपले आपले अंदाज वर्तविले आहे. अशातच टीव्ही 9 पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलच्या अंदाज समोर आला आहे. त्यानुसार, महाराष्ट्रात महायुतीला मोठा फटका बसणार आहे. महाराष्ट्रात तर महायुतीला 22 जागा तर महाविकास आघाडीला सर्वाधिक 25 जागांवर यश मिळण्याचा अंदाज आहे. देशात तिसऱ्यांदा मोदींची सत्ता येत आहे. हे सांगण्यासाठी एक्झिट पोलची गरज नाही, मात्र एनडीए सरकारने शेतकऱ्यांसंबंधी घेतलेल्या निर्णयाचा फटका या सरकारला बसू शकतो, राज्यात तोडफोडीच्या राजकारणामुळे ही भाजप आणि मित्र पक्षांना त्याचा मोठा फटका बसणार असल्याची शक्यता बुलढाणा अर्बनचे सर्वेसर्वा राधेश्याम चांडक यांनी व्यक्त केली आहे. ज्याप्रमाणे राज्यकर्त्यांनी निवडणूक काळात भाषणातून आपली भाषा वापरली, तीही आपत्ती जनक होती आणि त्यामुळे त्याचाही फटका राज्यकर्त्यांना आणि या नेत्यांना बसणार असल्याची शक्यता आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी होतील, अशी शक्यता असल्याचेहे चांडक यांनी म्हटले आहे.

Published on: Jun 02, 2024 02:26 PM
मुंबईकरांनो आता बिनधास्त घराबाहेर पडा, कारण…,‘मध्य रेल्वे’च्या विशेष मेगा ब्लॉकबाबत मोठी अपडेट
मोदी पुन्हा सत्तेत आल्यावर १५ दिवसात ठाकरे….राणांच्या दाव्यानं उडाली खळबळ