Lonavala Dam | लोणावळ्यातील भुशी डॅम ओव्हरफ्लो

| Updated on: Jun 19, 2021 | 11:15 AM

लोणावळा शहरातील पावसाळी पर्यटनाची मुख्य आकर्षण असलेले भुशी धरण ओव्हर फ्लो झाले. स्थानिक युवकांनी धरणाच्या सांडव्यावरुन दोन मोऱ्याची माती काढत धरणातील पाण्याला वाट मोकळी करुन दिली. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पुणे जिल्ह्यात पर्यटन बंदी आदेशामुळे पर्यटकांना धरणाच्या पाण्याखाली जाऊन भिजण्याचा आनंद यावर्षीदेखील घेता येणार नाही.| Lonavala  Bhushi Dam Overflow

लोणावळा शहरातील पावसाळी पर्यटनाची मुख्य आकर्षण असलेले भुशी धरण ओव्हर फ्लो झाले. स्थानिक युवकांनी धरणाच्या सांडव्यावरुन दोन मोऱ्याची माती काढत धरणातील पाण्याला वाट मोकळी करुन दिली. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पुणे जिल्ह्यात पर्यटन बंदी आदेशामुळे पर्यटकांना धरणाच्या पाण्याखाली जाऊन भिजण्याचा आनंद यावर्षीदेखील घेता येणार नाही. कोरोना महामारी मुळे मागील वर्षीपासून पर्यटनस्थळे बंद असल्यामुळे भुशी धरण हे पर्यटकांना मुकले आहे. या वर्षी देखील अद्यापही पर्यटन बंदी कायम असल्याने पर्यटकांचा हिरमोड झालेला आहे. मात्र पर्यटन बंदी असताना सुद्धा काही पर्यटक लपूनछपून भुशी धरण परिसरात येत आहेत.  भुशी धरणावर आलेल्या पर्यटकांना पोलिसांनी हुसकावून लावलं. पर्यटनबंदी असल्याने पोलिसांनी अशी भूमिका घेतलेली आहे.| Lonavala  Bhushi Dam Overflow Tourists Are Coming During The Restrictions

Satara Unlock | साताऱ्यात लॉकडाऊन शिथिल; महाबळेश्वर, पाचगणी पर्यटकांसाठी खुली
Sanjay Raut | यापुढे दिल्लीच्या तख्तासंदर्भात शिवसेनेची भूमिका महत्त्वाची असेल : संजय राऊत