VIDEO : Delhi | दिल्लीत विरोधकांचा लाँगमार्च, संजय राऊत म्हणतात, सर्वांना निलंबित केलं तरी प्रश्न विचारणारच

| Updated on: Dec 21, 2021 | 2:11 PM

लखमीपूर हिंसेप्रकरणी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेसह सर्व विरोधी पक्षांनी संसदेबाहेर लाँग मार्च काढला. त्यानंतर विरोधक मीडियाला सामोरे गेले. यावेळी विरोधकांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला. शिवसेना नेते संजय राऊत यांनी थेट भाजपवर हल्ला चढवला. संसदेचं हिवाळी अधिवेशन उद्या संपणार आहे.

लखमीपूर हिंसेप्रकरणी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेसह सर्व विरोधी पक्षांनी संसदेबाहेर लाँग मार्च काढला. त्यानंतर विरोधक मीडियाला सामोरे गेले. यावेळी विरोधकांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला. शिवसेना नेते संजय राऊत यांनी थेट भाजपवर हल्ला चढवला. संसदेचं हिवाळी अधिवेशन उद्या संपणार आहे. लखीमपूर खिरीची लढाई अजून संपली नाही. ही लढाई सुरूच राहील. एका मंत्र्याच्या मुलाने शेतकऱ्यांना चिरडले. हे कृत्य सर्व जगाने पाहिलं आहे. पण पंतप्रधान आणि गृहमंत्र्याने ही घटना पाहिली नाही. या प्रकरणी एसआयटीचा रिपोर्ट आला. तुम्ही एसआयटी स्थापन केली. तुमचीच एसआयटी आहे. तरीही तुम्ही एसआयटीचा रिपोर्ट मानत नाही त्यामागचे कारण काय?, असा सवाल राऊत यांनी केला.

VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 1 PM | 21 December 2021
Nashik | ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर नियम पाळा, लस घ्या नाहीतर… – जिल्हाधिकारी सुरज मांढरे