Beed Case : वाल्मिक कराडवर मकोका अन् 10 मिनिटांत परळीत शुकशुकाट, समर्थक रस्त्यावर अन्…

| Updated on: Jan 14, 2025 | 3:30 PM

काल मस्साजोगमध्ये ग्रामस्थांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले होते. या आंदोलनात स्वतः संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख देखील सहभागी झाले होते. मस्साजोगच्या आक्रमक पवित्र्यानंतर आज वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात आलाय.

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या प्रकरणातील मोठी बातमी समोर आली आहे. नुकतीच वाल्मिक कराडवर मकोका कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा खरा मास्टरमाईंड म्हणून वाल्मिक कराडवर आरोप होत असताना आता वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात आलाय. संतोष देशमुख हत्या प्रकरणात आतापर्यंत ८ जणांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. मात्र त्यावेळी वाल्मिक कराड याच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली नव्हती. दरम्यान, काल मस्साजोगमध्ये ग्रामस्थांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले होते. या आंदोलनात स्वतः संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख देखील सहभागी झाले होते. मस्साजोगच्या आक्रमक पवित्र्यानंतर आज वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात आलाय. यानंतर वाल्मिक कराडचे समर्थक चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले आणि पुढील १० मिनिटांतच बीड जिल्ह्यातील परळीमध्ये बंदची हाक देण्यात आली आणि संपूर्ण परळीमध्ये एकच शुकशुकाट निर्माण झाला. वाल्मिक कराडच्या समर्थकांकडून करण्यात आलेल्या परळी बंदमध्ये सर्व दुकानं बंद करण्यात आल्याचे पाहायला मिळाले तर यामध्ये मेडिकल दवाखने सुरू असल्याची माहिती मिळतेय.

Published on: Jan 14, 2025 03:20 PM
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका
Suresh Dhas : वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…’त्यांना शिक्षा होणार’