‘म्हातारं लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला लावून…’, शरद पवारांवर कुणी साधला निशाणा?
दादाच्या लक्षात आलं की आता हे म्हातारं काय किल्ली देत नाय, त्यामुळं आता दादा किल्लीला लोंबकळत दादा म्हणतंय, आता किल्ली तोडल्याशिवाय शांत बसणार नाय... असे म्हणत सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर सडकून टीका केली.
म्हातारं लय खडूस हाय, तिजोरीची किल्ली कंबरेला लावून फिरतंय, तर अजित दादा किल्लीकडं बघून बघून म्हातारं झालं, अशा शब्दात सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर जोरदार निशाणा साधला. सदाभाऊ खोत पुढे असेही म्हणाले की, दादाच्या लक्षात आलं की आता हे म्हातारं काय किल्ली देत नाय, त्यामुळं आता दादा किल्लीला लोंबकळत दादा म्हणतंय, आता किल्ली तोडल्याशिवाय शांत बसणार नाय… असे म्हणत सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर सडकून टीका केल्याचे पाहायला मिळाले. माढा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ सभेचे आयोजन करण्यात आले होते. सांगोला तालुक्यातील कोळे येथील सभेत सदाभाऊ खोत बोलत होते. त्यावेळी त्यांनी शरद पवारांवर हल्लाबोल केला.
Published on: Apr 26, 2024 04:29 PM