‘यमराज’नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री

| Updated on: Apr 18, 2024 | 4:01 PM

लोकसभा निवडणूक लढवणारे उमेदवार वेगवेगळ्या क्लुप्त्या करत आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. माढा लोकसभेसाठी एका उमेदवाराने चक्क रेड्यावर बसून आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्याचे पाहायला मिळत आहेत. बघा व्हिडीओ...

लोकसभा निवडणुकीचं पहिल्या टप्प्यातील मतदान उद्या पार पडणार आहे. अशातच अर्ज भरण्याचा अंतिम दिवसही जवळ येत आहे. त्यामुळे लोकसभा निवडणूक लढवणारे उमेदवार वेगवेगळ्या क्लुप्त्या करत आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. माढा लोकसभेसाठी एका उमेदवाराने चक्क रेड्यावर बसून आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्याचे पाहायला मिळाले. यामुळे माढ्यातल्या एका उमेदवाराने सर्वांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे. मराठा समाजाचे राज्य समन्वयक राम गायकवाड यांनी लोकसभेचा उमेदवारी अर्ज दाखल करताना रेड्यावरच बसून एन्ट्री घेतली. माढा लोकसभेसाठी मराठा समाजाचे राज्य समन्वयक राम गायकवाड हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. यावेळी राम गायकवाड यांनी यमराजाच्या वेशभूषा केली होती आणि ते रेड्यावर बसून आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निघालेत. लोकसभा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निघालेले राम गायकवाड बघा काय म्हणाले ?

Published on: Apr 18, 2024 04:01 PM
नाची, डान्सर आणि… नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
अजित पवारांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?