माढा लोकसभेची जागा महादेव जानकर यांना मिळणार? शरद पवार यांच्यासोबत झाली चर्चा
माढ्याची लोकसभेची जागा राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांना मिळणार.... शरद पवार आणि महादेव जानकर यांच्यात यासंदर्भात चर्चा झाल्याचेही माहिती समोर येत आहे. तर येत्या दोन दिवसात माढ्याच्या लोकसभेच्या जागेसंदर्भातील अधिकृत निर्णय होणार.
मुंबई, ६ मार्च २०२४ : माढ्याची लोकसभेची जागा राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांना मिळणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. शरद पवार आणि महादेव जानकर यांच्यात यासंदर्भात चर्चा झाल्याचेही माहिती समोर येत आहे. तर येत्या दोन दिवसात माढ्याच्या लोकसभेच्या जागेसंदर्भातील अधिकृत निर्णय होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. दरम्यान, राज्यातील सत्ताधारी महायुतीच्या पक्षात लहान घटक पक्षांची घुसमट होताना दिसत असताना महादेव जानकर यांनी भाजप विरोधात उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. तर महादेव जानकर गेल्या काही दिवसांपासून महायुतीवर नाराज असल्याच्या चर्चा सुरू असताना शरद पवार यांनी जानकर यांना थेट साद घालत त्यांच्या कोट्यातील माढा लोकसभेची जागा देण्याची तयारी दर्शविल्याचीही चर्चा होत आहे. तर आम्ही सध्या कुठल्याही महाविकस आघाडी किंवा महायुतीत समाविष्ट नाही आहे. शरद पवार यांनी माढाची जागा आम्हला देतो अस म्हटलं होतं मात्र आमचं माढा आणि परभणी ह्या दोन जागा आम्ही हट्टास आहे. महाविकास आघाडी व महायुतीच्या बैठकीचं आम्हाला बोलावणं आलं नाही, असेही जानकर यांनी दोन दिवसांपूर्वी म्हटलं होतं.