पंढरपुरात माघी एकादशीची लगबग, कशी आहे मंदिर प्रशासनाची तयारी? बघा व्हिडीओ

| Updated on: Jan 31, 2023 | 2:13 PM

पंढरपूर येथे होणाऱ्या माघी एकादशीसाठी पंढरपूर मंदिर प्रशासन सज्ज, कमीत-कमी वेळात जास्तीत जास्त भाविकांना विठुरायाचे दर्शन मिळण्यासाठी कसे असणार मंदिर प्रशासनाचे नियोजन?

सोलापूर : उद्या असलेल्या माघी एकादशीच्या सोहळ्यासाठी सुमारे तीन ते चार लाख भाविक पंढरपुरात दाखल झाले आहेत. श्री विठ्ठल रुक्मिणीमातेच्या दर्शानाची रांग मंदिरापासून पाच किलो मीटर लांब गेली असून दर्शानासाठी भाविकांना जवळपास पाच ते सहा तासाचा कालावधी लागत आहे. मंदिर परिसर, प्रदक्षिणा मार्ग, चंद्रभागा वाळवंट भाविकांच्या गर्दीने फुलून गेला आहे. तर उद्या पंढरपुरात दाखल होणाऱ्या भाविकांना लवकरात लवकर आणि सुलभ दर्शन होण्यासाठी मंदिर प्रशासनाकडून योग्य ती उपाययोजना करण्यात आली आहे. माघ वारीला वेगळे महत्त्व असल्याने पंढरपुरात असंख्य वारकरी दाखल होत असतात. त्यामुळे मंदिर प्रशासन भाविकांना विठुरायाचे दर्शन देण्यासाठी सज्ज आहे, असे पंढरपूर मंदिर समितीचे सहअध्यक्ष औसेकर महाराज यांनी सांगितले आहे. तर उद्या असणाऱ्या माघ एकादशीला पाच ते सहा लाख भाविक दाखल होण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.