VIDEO : Navneet Rana | मुख्यमंत्र्यांच्या सभेपूर्वी राणा दाम्पत्याकडून दिल्लीत महाआरती, थेट
नवनीत राणा आणि रवी राणा यांची जेलवारी आणि त्यानंतर झालेले राजकीय आरोप अजूनही देशात चर्चेचा विषय आहे. मात्र आता शिवसेनेनेही राणा दाम्पत्याविरोधात आक्रमक पवित्रा घेत जशाच तसे उत्तर देण्याचं ठरवलं आहे. शिवसेना राणा यांच्या हनुमान चालिसाला उत्तर हे महाआरतीने देणार आहे.
राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून मोठा राजकीय गदारोळ सुरू आहे. सुरूवातील राज ठाकरे यांनी मशीदीवरील भोंग्यांविरोधात हनुमान चालीसा अशी हाक दिली. तर दुसरीकडे भाजपनेही या भूमिकेचं समर्थन केलं. मात्र काही दिवसातच राणा दाम्पत्याने हनुमान चालिसाचा मुद्दा पुन्हा उचलत राज्यात रान पेटवलं. त्यानंतर जे झालं ते संपूर्ण देशाने पाहिलं. नवनीत राणा आणि रवी राणा यांची जेलवारी आणि त्यानंतर झालेले राजकीय आरोप अजूनही देशात चर्चेचा विषय आहे. मात्र आता शिवसेनेनेही राणा दाम्पत्याविरोधात आक्रमक पवित्रा घेत जशाच तसे उत्तर देण्याचं ठरवलं आहे. शिवसेना राणा यांच्या हनुमान चालिसाला उत्तर हे महाआरतीने देणार आहे. खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांनी दिल्लीत पत्रकार परिषदेत 14 मे रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेपूर्वी हनुमान मंदिरात महाआरती व हनुमान चालीसा पठण करण्याचे जाहीर केले. त्यानुसार आज ते दिल्ली येथे आरती करत आहेत.