सोलापुरातील मारकडवाडी राजकीय केंद्र, शरद पवार ग्रामस्थांशी संवाद साधणार, कारण नेमकं काय?

| Updated on: Dec 08, 2024 | 10:59 AM

ग्रामस्थांना बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा प्रयत्न प्रशासनाने रोखला. त्यानंतर विरोधकांनी मारकडवाडीच्या ग्रामस्थांना पाठिंबा दिला. आज शरद पवार देखील मारकवडवाडी येथे दाखल होत ग्रामस्थांशी संवाद साधणार आहेत.

ईव्हीएमचा विरोध आणि बॅलेट पेपरवर मतदानासाठी महाविकास आघाडी मोहीम सुरू करण्याच्या प्रयत्नात आहे. बॅलेट पेपरवर मतदानाची चाचणी घेण्यासाठी रोखल्याने शरद पवार मारकडवाडीत येणार आहेत. सोलापूर जिल्ह्यातील मारकडवाडी गाव आता राजकारणाच्या केंद्रस्थानी आलंय. ग्रामस्थांना बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा प्रयत्न प्रशासनाने रोखला. त्यानंतर विरोधकांनी मारकडवाडीच्या ग्रामस्थांना पाठिंबा दिला. आज शरद पवार देखील मारकवडवाडी येथे दाखल होत ग्रामस्थांशी संवाद साधणार आहेत. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार उत्तमराव जानकर ज्या मतदारसंघातून निवडून आलेत त्याच माळशिरस विधानसभा मतदारसंघात हे गाव आहे. माळशिरस विधानसभा मतदारसंघातून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार उत्तमराव जानकर हे विजयी झालेत तर भाजपच्या राम सातपुते यांचा पराभव झालाय. मात्र विजयी होऊनही उत्तमराव जानकरांनी मारकवडवाडीतल्या मतदानावर शंका उपस्थित केली आहे. उत्तम जानकर यांना ८४३ तर भाजपच्या राम सातपुते यांना १००३ मतं मिळाली. लोकसभेत मविआला लीड होतं. मग महायुतीला अधिक मतदान कसं? असा आक्षेप गावकऱ्यांचा आहे. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट

Published on: Dec 08, 2024 10:59 AM
फडणवीसांकडून मनसेला सोबत घेण्याचे संकेत, शिंदेच्या सेनेची संमती की विरोध?
सोमय्यांचा अभ्यास खोटा? दादांना दिलासा मोठा; महायुतीत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ अन् दुसऱ्याच दिवशी संपत्तीची वापसी