Chandrashekhar Bawankule : ‘… हा म्हणजे संविधानाचा अवमान’, चंद्रशेखर बावनकुळेंचा ‘मविआ’वर घणाघात

| Updated on: Dec 08, 2024 | 5:10 PM

शपथ घेण्यास नकार म्हणजेच संविधानाचा अपमान असल्याचेही चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. महाविकास आघाडीकडून संविधानाचा अवमान असल्याचे म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक ट्विट करत मविआवर चांगलाच हल्लाबोल केलाय

विरोधकांनी काल केलेल्या सभा त्यागावरून भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. तर विरोधकांना संविधान फक्त निवडणुकीपुरतेच आठवते, असं म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी विरोधकांवर घणाघात केला आहे. तर शपथ घेण्यास नकार म्हणजेच संविधानाचा अपमान असल्याचेही चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. महाविकास आघाडीकडून संविधानाचा अवमान असल्याचे म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक ट्विट करत मविआवर चांगलाच हल्लाबोल केलाय. ‘राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान फक्त निवडणुकीपुरते आठवते, हे त्यांनी आपल्या कालच्या कृतीतून सिद्ध केले’, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. तर विधानसभेतील नवनिर्वाचित सदस्यांना संविधानाच्या साक्षीने आमदारकीची शपथ घेणे संविधानिकदृष्ट्या आवश्यक असूनही मविआ सदस्यांनी शपथ घ्यायला नकार दिला. हा संविधानाचा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान आहे. याचा निषेध करावा तेवढे कमीच असल्याचेही चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.

Published on: Dec 08, 2024 05:10 PM
Saamana : ‘आम्ही कसे हरलो?’ निकालानंतर खासगी संस्थेकडून सर्व्हेक्षण, ‘सामना’तून थेट आकडेच प्रसिद्ध
Navneet Rane : ‘होऊन जाऊद्या… रवी राणाही आमदारकीचा राजीनामा देतील’, नवनीत राणांचं विरोधकांना थेट आव्हान