उद्धव ठाकरेंसह मविआ नेत्यांनी महायुती सरकारला मारले जोडे, बघा व्हिडीओ
मुंबईतील हुतात्मा चौक ते गेट वे ऑफ इंडियापर्यंत शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले यांच्या नेतृत्वात मुंबईत ‘जोडे मारो’ आंदोलन कऱण्यात आलं. हे आंदोलन मालवण येथील राजकोट किल्ल्यावर उभारलेला शिवरायांचा पुतळा अवघ्या ८ महिन्यात कोसळल्याच्या निषेधार्थ मविआने महायुती सरकारचा निषेध व्यक्त केला.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे असणाऱ्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यात आला होता. या पुतळ्याचे गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण झाल होते. मात्र उद्घाटनानंतर केवळ आठच महिन्यात शिवरायांचा पूर्णाकृती हा पुतळा कोसळला. त्यानंतर राज्यभरातून शिवप्रेमींची संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. या घटनेनंतर महाविकास आघाडीकडून या घटनेच्या निषेधार्थ जोडे मारो मोर्चा काढण्यात आला आहे. मुंबईतील हुतात्मा चौक ते गेटवे ऑफ इंडियापर्यंत महाविकासआघाडीचा मोर्चा होता. या आंदोलनात शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे शरद पवार आणि काँग्रेसचे नाना पटोले यांसह अनेक दिग्गज नेते या आंदोलनात सहभागी होते. तब्येत बरी नसताना आणि वय बाजूला ठेवून शरद पवार आणि छत्रपती शाहू महाराज हे देखील काही वेळ या मोर्चामध्ये सामील झाल्याचे दिसले. यावेळी ‘जय भवानी, जय शिवाजी’चा जयघोष आणि ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ असं म्हणत शेकडो कार्यकर्ते गेट वे ऑफ इंडियाच्या दिशेने रवाना झाले आणि त्याच ठिकाणी महायुतीच्या सरकारचा निषेध करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या फोटाला चप्पलाने मारले.