‘शेतकऱ्यांचं मरण हेच सरकारचं धोरण’, सरकारविरोधात निघाला काँग्रेसचा मोर्चा

| Updated on: Mar 28, 2023 | 10:36 PM

VIDEO | सरकारने शेतकाऱ्यांच्या मागण्या मान्य न केल्यास रस्त्यावर उतरणार, काँग्रेसने दिला सरकारला इशारा

बुलढाणा : शेतकऱ्यांच्या हक्काचा पिक विमा अद्यापही शेतकऱ्याला मिळालेला नाही, अवकाळी पाऊस आणि गारपीठ झाल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी यासह इतर मागण्यांसाठी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप सानंदा यांनी मोर्चा काढला होता. काँग्रेस आयोजित केलेल्या महाविकास आघाडीचा मोर्चा खामगाव येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ‘शिंदे-मोदी शेतकरी विरोधी’, ‘शेतकऱ्यांचे मरण सरकारचे धोरण’ अशा लिहलेल्या टोप्या डोक्यात घालून जोरदार घोषणाबाजी करत सरकारचा निषेध केल्याचे पाहायला मिळाले. सरकारने मागण्या मान्य न केल्यास राज्यभर काँग्रेस रस्त्यावर उतरणार असल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

Published on: Mar 28, 2023 10:34 PM
‘सावरकर गौरव यात्रेने राहुल गांधींनी उपस्थित केलेले प्रश्न सुटणार का?’, मुख्यमंत्र्यांनाच सवाल
काँग्रेस आमदाराच्या नावानं मागितली लाच अन्…, कुठं घडला धक्कादायक प्रकार