Neelam Gorhe Video : नीलम गोऱ्हेंना ‘ते’ वक्तव्य भोवणार? त्यांच्याविरोधात ‘मविआ’कडून अविश्वास प्रस्ताव, उपसभापतीपद हातून जाणार?

Neelam Gorhe Video : नीलम गोऱ्हेंना ‘ते’ वक्तव्य भोवणार? त्यांच्याविरोधात ‘मविआ’कडून अविश्वास प्रस्ताव, उपसभापतीपद हातून जाणार?

| Updated on: Mar 06, 2025 | 11:09 AM

नीलम गोऱ्हे यांच्याविरोधात विरोधी पक्ष आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच महाविकास आघाडीकडून नीलम गोऱ्हे यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.

नवी दिल्लीतील साहित्य संमेलनात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविषयी वादग्रस्त विधान केल्यामुळे शिंदें यांच्या शिवसेनेच्या नेत्या आणि उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे या चांगल्या कोंडीत सापडल्या आहेत. नीलम गोऱ्हे यांच्याविरोधात विरोधी पक्ष आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच महाविकास आघाडीकडून नीलम गोऱ्हे यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. दरम्यान, विधान परिषद सभापती राम शिंदे यांच्याकडे मागणी करताना मविआकडून सादर करण्यात आलेल्या प्रस्तावात डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सभागृहाचा विश्वास गमावल्याने त्यांना उपसभापतीपदावरून दूर करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे. राज्याच्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन आजचा चौथा दिवस आहे. मात्र गेल्या तीन दिवसांपासून आजारपणामुळे त्या विधान परिषद सभागृहात उपस्थित राहिलेल्या नसल्याची माहिती मिळतेय. त्यातच बुधवारी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विरोधकांच्या वतीने विधान परिषद सभापती राम शिंदे यांच्याकडे अविश्वासाचा प्रस्ताव सादर केला आहे. यासंदर्भात आज माध्यमांना प्रतिक्रिया देताना अंबादास दानवेंनी माहिती दिली आणि पुढील निर्णय  विधान परिषद सभापती राम शिंदे घेतील असे सांगितले.

Published on: Mar 06, 2025 11:07 AM
Swargate Bus Crime Video : स्वारगेट अत्याचार घटनेतील नराधमाचा कारनामा उघड, आरोपी पोलिसांचा गणवेश घालायचा अन्…
Dhananjay Munde Video : मुंडेंच्या जागी बीड जिल्ह्यातील आमदारालाच मंत्रिपद? मराठा आमदाराची लागणार वर्णी? ‘या’ नावाची चर्चा