संभाजीनगरातील ‘मविआ’च्या सभेची जय्यत तयारी पूर्ण, बघा कशी आहे व्यवस्था
VIDEO | मविआच्या सभेची मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावरील जय्यत तयारी पूर्ण, बघा व्हिडीओ
संभाजीनगर : येत्या २ एप्रिल रोजी छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीची जाहीर सभा होणार आहे. शिंदे-फडणवीस सरकारविरोधात महाविकास आघाडीकडून राज्यभरात सभा घेतल्या जाणार असून ही पहिली सभा असणार आहे. या सभेला मोठे नेते उपस्थित राहणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, राज्याच्या राजकारणात छत्रपती संभाजीनगर या शहराचं महत्त्व अधिक वाढल्याचे दिसून येत आहे. कारण येत्या २ एप्रिलपासून महाविकास आघाडीच्या एकत्र जाहीर सभांना सुरूवात होणार असून त्यानंतर लगेच ८ किंवा ९ एप्रिल रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील त्याच शहरात जाहीर सभा घेणार आहेत. दरम्यान, रविवारी २ एप्रिलरोजी महाविकास आघाडीची होणारी जाहीरसभा मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर होणार असून या सभेची जय्यत तयारी आता पूर्ण होत असून अंतिम टप्प्यात आहे. बघा कशी आहे मविआच्या सभेची मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावरील होणाऱ्या जाहीर सभेची तयारी आणि व्यवस्था…