अखेर ठरलं…महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित, सूत्रांकडून मोठी अपडेट

| Updated on: Mar 17, 2024 | 4:54 PM

महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला अखेर ठरला आहे. या जागावाटपाच्या फॉर्म्युल्यानुसार महाविकास आघाडीतील ठाकरेंची शिवसेनाच मोठा भाऊ होणार असल्याची चिन्ह पाहायला मिळत आहे. या फॉर्म्युल्यानुसार ठाकरे गट सर्वाधिक जागांवर निवडणूक लढणार

मुंबई | 17 मार्च 2024 : महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला अखेर ठरला आहे. या जागावाटपाच्या फॉर्म्युल्यानुसार महाविकास आघाडीतील ठाकरेंची शिवसेनाच मोठा भाऊ होणार असल्याची चिन्ह पाहायला मिळत आहे. या फॉर्म्युल्यानुसार ठाकरे गट सर्वाधिक 22 जागांवर निवडणूक लढणार आहे. महाविकास आघाडीच्या आज ठरलेल्या फॉर्म्युल्यात वंचित बहुजन आघाडीचा समावेश नसल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी ‘टीव्ही 9 मराठी’कडे दिली आहे. पण तरीदेखील वंचितसाठी 4 जागा सोडण्याचा विचार महाविकास आघाडी करत आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.तर महाविकास आघाडीचा 22, 16 आणि 10 असा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. यामध्ये ठाकरे गटाला 22, काँग्रेसला 16 आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला 10 जागा सोडण्याचा निर्णय झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. जागावाटपाच्या या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के. सी. वेणुगोपाल, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि काँग्रेस-राष्ट्रवादीचे स्थानिक नेते उपस्थित होते. या बैठकीत महाविकास आघाडीचं जागावाटपाचं सूत्र निश्चित झाल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळत आहे.

Published on: Mar 17, 2024 04:54 PM
तर आज तुमच्या ‘भगव्या’ शालीचा रंग… भाजप नेत्याचा उद्धव ठाकरेंना टोला काय?
ठाकरेंची साथ सोडून शिंदेंच्या शिवसेनेचं धनुष्यबाण हाती घेतल्यानंतर आमश्या पाडवी म्हणाले…