महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, कोणता पक्ष लढणार सर्वाधिक जागा
शिवसेना ठाकरे गट 48 पैकी 23 जागा लढवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे तर 23 पैकी दोन जागा मित्र पक्षांना देण्याची ठाकरे गटाची तयारी आहे. तर काँग्रेसच्या वाटेला 15 ते 17 जागा मिळणार.... मविआचं जागावाटप सर्वात आधी 'tv9 मराठीवर' , पाहा ग्राफिक्सच्या माध्यमातून
मुंबई, २९ फेब्रुवारी २०२४ : महाविकास आघाडीच्या जागावाटपाची महत्त्वाची माहिती ‘टीव्ही9 मराठी’कडे आली आहे. शिवसेना ठाकरे गट 48 पैकी 23 जागा लढवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे तर 23 पैकी दोन जागा मित्र पक्षांना देण्याची ठाकरे गटाची तयारी आहे. तर काँग्रेसच्या वाटेला 15 ते 17 जागा मिळणार असल्याची माहिती मिळत आहे. तर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला 9 ते 11 जागा मिळणार आहेत. दरम्यान, चित बहुजन आघाडी महाविकास आघाडीसोबत आल्यास अकोल्याची जागा दिली जाणार आहे. त्याशिवाय वंचित सोबत आल्यास त्यांना आणखी एक ते दोन जागा दिली जाण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ठाकरे गट मुंबईत 4 जागा लढण्याच्या तयारीत आहे. शरद पवार गट उत्तर मुंबईसाठी उत्सुक नाही. त्यामुळे उत्तर मुंबईची जागा कुणी लढणार नसेल तर ठाकरे गट लढणार, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.