लोकसभेचं महाविकास आघाडीचं जागावाटप निश्चित? कोणता पक्ष कोणत्या जागा लढवणार?

| Updated on: Nov 15, 2023 | 11:21 AM

देशात आणि राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे वारे वाहण्यास सुरूवात. राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी पर्यायाने इंडिया आघाडी असा सामना रंगण्याची शक्यता. मात्र इंडिया आघाडीत अनेक पक्ष एकत्र येत असताना जागा वाटपाचं काय? राज्यात मविआमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार?

मुंबई, १५ नोव्हेंबर २०२३ | लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी विरूद्ध महायुतीचा सामना रंगणार आहे. अशामध्ये जागा वाटपाचा तिढा सुटणार का? असा सवालही उपस्थित केला जात आहे. अशातच महाविकास आघाडीकडून जागा वाटप निश्चित झाल्याचे सूत्रांकडून कळतंय. देशात आणि राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे वारे वाहण्यास सुरूवात झाली आहे. राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी पर्यायाने इंडिया आघाडी असा सामना रंगण्याची शक्यता आहे. मात्र इंडिया आघाडीत अनेक पक्ष एकत्र येत असताना जागा वाटपाचं काय? राज्यात महाविकास आघाडीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार? जागा वाटपावरून महाविकास आघाडीमध्ये बिघाडी तर होणार नाही ना? असे प्रश्न विचारले जात असताना लोकसभेचं महाविकास आघाडीचं जागावाटप निश्चित झाल्याचे सांगितले जात आहे. बघा या संदर्भातील स्पेशल रिपोर्ट

Published on: Nov 15, 2023 11:21 AM
Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील यांचा पुन्हा एल्गार, 9 जिल्ह्यात 24 सभा घेणार; कसा असणार महाराष्ट्र दौरा?
नुसतं नावातच ‘राम’ नाही तर तो हृदयातही हवा, रामदास कदम यांच्यावर महिला नेत्याची सडकून टीका