‘उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नसते तर महाराष्ट्राची स्मशानभूमी झाली असती’
VIDEO | नागपूर रामटेकवरून उध्दव ठाकरे यांच्या समर्थनात घोषणाबाजी करत मातोश्रीवर महाभारत यात्रा दाखल
मुंबई : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध अन्याय होत असल्याचा आरोप करीत युवा परिवर्तन की आवाज संघटनेकडून गडमंदिर रामटेक ते मुंबई येथील मातोश्री भवनपर्यंत महाभारत यात्रेचे आयोजन केले होते. दरम्यान, आज नागपूर रामटेकवरून उध्दव ठाकरे यांच्या समर्थनात घोषणाबाजी करत काही लोक हे मातोश्रीवर दाखल झालेत. युवा परिवर्तन सामाजिक संघटनेतील १०० हुन अधिक लोक मातोश्रीवर दाखल होत त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. सध्या देशात, राज्यात केंद्रीय तपास यंत्रणेमार्फत ज्या चुकीच्या पद्धतीने करण्यात येणाऱ्या कारवाईविरोधात आणि हुकूमशाही विरोधात ही महाभारत यात्रा असल्याचे सांगितले जात आहे. उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध हुकूमशाहीने कट रचला गेला, त्यांचे सरकार पाडून पक्षाचे नाव आणि चिन्हावर देखील ताबा मिळविण्यात आला. याविरोधात जनमानसातील रोष व्यक्त करण्यासाठी दहा दिवस विविध जिल्ह्यामधून ही महाभारत यात्रा काढण्यात आली आहे. याबद्दल यात्रा संयोजक निहाल पांडे यांनी आपली प्रतिक्रिया देत सध्या सत्तेत असलेल्या लोकांवर जोरदार निशाणा साधला आहे.