महाडचे माजी आमदार माणिकराव जगताप यांचे कोरोनामुळे निधन

| Updated on: Jul 26, 2021 | 9:39 AM

माणिकराव जगताप हे काँग्रेसचे विद्यमान रायगड जिल्हा अध्यक्ष होते. महाड पोलादपूर विधानसभा मतदारसंघातून त्यांनी याआधी आमदारकी भूषवली होती. 2004 च्या विधानसभा निवडणुकीत ते महाड विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले होते.

महाडचे माजी आमदार आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष माणिकराव जगताप (Manikrao Jagtap) यांचे निधन झाले. वयाच्या 54 व्या वर्षी माणिकराव जगताप यांनी अखेरचा श्वास घेतला. मुंबईत रविवारी मध्यरात्री 12 वाजताच्या सुमारास अल्पशा आजाराने त्यांची प्राणज्योत मालवली. महाराष्ट्र काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन त्यांच्या निधनाचे वृत्त देण्यात आले आहे. कॉंग्रेस पक्षाने कर्तृत्ववान आणि उमदे नेतृत्व गमावल्याच्या भावना व्यक्त केल्या जात आहेत.

माणिकराव जगताप हे काँग्रेसचे विद्यमान रायगड जिल्हा अध्यक्ष होते. महाड पोलादपूर विधानसभा मतदारसंघातून त्यांनी याआधी आमदारकी भूषवली होती. 2004 च्या विधानसभा निवडणुकीत ते महाड विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले होते. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या उपाध्यक्षपदाची धुराही त्यांच्या खांद्यावर होती. आज दुपारी 2 वाजता महाड येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

Published on: Jul 26, 2021 09:39 AM
100 Super Fast News | सुपरफास्ट 100 न्यूज | 26 July 2021
त्र्यंबकेश्वर, पाहिने, भावलीमध्ये पर्यटकांची गर्दी, नागरिकांना कोरोना नियमांचा विसर