Mahadev Jankar : महादेव जानकरांनी हॉटेलवर तळले बटाटा वडे! राष्ट्रवादी, शिवसेनेच्या आमदारांची मिश्किल टिप्पणी

| Updated on: Jun 17, 2022 | 9:11 PM

अक्कलकोट तालुक्यातील चपळगावमध्ये बचत गटाच्या महिलांकडून हॉटेल चालवलं जातं. त्यावेळी तिथे एक आजी वडे तळत होत्या. त्यांना पाहून महादेव जानकर यांनी त्यांच्या हातातील झाऱ्या घेऊन बटाटे वडे तळण्याचा प्रयत्न केला.

सोलापूर : राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मंत्री महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी एका गावात चक्क बटाटे वडे तळले! अक्कलकोट तालुक्यातील चपळगावमध्ये बचत गटाच्या महिलांकडून हॉटेल चालवलं जातं. त्यावेळी तिथे एक आजी वडे तळत होत्या. त्यांना पाहून महादेव जानकर यांनी त्यांच्या हातातील झाऱ्या घेऊन बटाटे वडे (Batata Vada) तळण्याचा प्रयत्न केला. यावेळी महादेव जानकर यांच्यासह शिक्षक आमदार विक्रम काळे (Vikram Kale), शिवसेना आमदार अंबादास दानवेही उपस्थित होते. दरम्यान, राष्ट्रवादीचे आमदार विक्रम काळे यांनी मिश्किल टिप्पणी केलीय. “महादेव जानकर यांच्यावर वडे तळण्याची वेळ” अशी हेडलाईन होईल असा चिमटा विक्रम काळे यांनी काढला. त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या अंबादास दानवे इतरांमध्ये एकच हशा पिकला. विक्रम काळे यांच्या टिप्पणीवर जानकरांनीही हसून दाद दिली.

सोलापूर जिल्ह्यात आलेल्या पंचायतराज समितीच्या दौऱ्यात अनेक मजेदार किस्से पाहायला मिळाले. एकीकडे सदाभाऊ खोत यांना अडवून पैसे मागणाऱ्या कार्यकर्त्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला. दुसरीकडे राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मंत्री महादेव जानकर यांचा हा वडे तळतानाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

Published on: Jun 17, 2022 09:11 PM
Udayanraje Bhosale on Ajit Pawar | उदयनराजे भोसले यांचं अजित पवारांना सडेतोड उत्तर, पहा व्हिडीओ
Special Report | गोष्ट सदाभाऊ खोतांच्या उधारीची-tv9