दहा वर्षापासून पत्रकारितेत. मराठीतल्या नामांकित वृत्तवाहिन्यांमध्ये काम. एकनाथजी रानडे-जीवन आणि कार्य पुस्तकाचे लेखक, वाचन, क्रीडा, चित्रपट पहायला, चर्चा करायला आवडते.
माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथे सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना भेट दिली. त्यांनी देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली, तिला बारामतीतील वसतिगृहात प्रवेश मिळवून देण्याचे व कॉलेजपर्यंतचे शिक्षण देण्याचे आश्वासन दिले. तसेच, त्यांनी कुटुंबाच्या संरक्षणाची जबाबदारी घेतली आणि सरकारकडून मिळालेल्या मदतीचे बँकेत जतन करण्याचा सल्ला दिला. गावकऱ्यांनी पोलिसांच्या उदासीनतेबाबत तक्रार केली.
खासदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर मध्य मतदारसंघात काँग्रेसचा निष्ठावंत कार्यकर्ता निवडणूक लढवेल, अशी भूमिका काल मांडली होती. त्यांच्या या वक्तव्यावरुन मविआत वाद होण्याची शक्यता आहे. प्रणिती यांच्या वक्तव्यावर सोलापुरातील एका बड्या नेत्याने भूमिका मांडली आहे.
Maratha Reservation : मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन केले. त्याला वर्ष झाले. या एका वर्षात त्यांनी मुंबईवर पण चाल केली. वाशी येथे राज्य सरकारने त्यांची मोठी मागणी मान्य केली. पण आता मनोज जरांगे यांच्याविरोधात उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
"आपल्याला फक्त सत्तेसाठी बदल नकोय तर दिल्लीसमोर न झुकणारे सरकार पाहिजे. दिल्लीसमोर मुजरा करणार नाही, असे सरकार मला हवे आहे. प्रत्येक गोष्टीला हे दिल्लीसमोर झुकतात", असा घणाघात सुप्रिया सुळे यांनी केला.
त्यांची नोंद नसून त्यांना आरक्षण मिळतंय. आमची नोंद असून आरक्षण नाही. कैकाडी समाजाचे लोक आले होते. त्यांची जात विदर्भात एससीत आहे. खान्देशात एसटी आरक्षणात आहे आणि मराठवाड्यात ओबीसी आरक्षणात आहे. मंडल कमिशनने एकच जात तीन आरक्षणात टाकली. मंडल आयोगाने काडी लावली. आम्हाला कोणत्याही एकाच वर्गात आरक्षण द्या अशी कैकाडी समाजाची मागणी आहे. ,मराठवाड्यात कैकाडी समाजाची मुलगी एससी आहे. पण विदर्भात लग्न करून गेली तर ओबीसी होते. आपल्यासारखंच आहे. आपली पोरगी विदर्भात गेली तर कुणबी होते आणि मराठा पोरगी मराठवाड्यात आली की ओपन कॅटेगिरीत जाते.
येत्या राखी पौर्णिमेला लाडक्या बहिणींसाठी तो जीआर काढून खरी ओवाळणी द्या अशी मागणी तिने या पत्रात केली आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय निर्णय घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Z P School Admission Housefull : पालकांचा इंग्रजी शाळांकडे ओढा वाढल्यापासून जिल्हा परिषदेच्या शाळा जणू ओस पडल्या आहेत. अगदी ग्रामीण भागातही इंग्रजी शाळांचे फॅड वाढल्याने मराठी शाळांना कोणी वाली उरले नाही, पण सोलापुरातील या शाळेने हा समज खोडून काढला आहे.
Health Minister Tanaji Sawant shed tears : मंत्री असले तरी त्यांना पण भाव-भावना असतातच. त्या काही लपविता येत नाही. आरोग्यमंत्री तानाजी सावंतांना पण त्यांच्या भावना रोखता आले नाही. त्यांना अश्रू अनावर झाले. त्यांना हुंदके आवरले नाही.
Praniti Shinde On Devendra Fadnavis: काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी लोकसभा निवडणुकीनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तोफ डागली आहे. फडणवीस यांचा सोलापूरमध्ये दंगल घडविण्याचा प्लॅन होता असा खळबळजनक आरोप त्यांनी केला आहे.
Mahesh Bhandari on Solapur Chimani Demolished : सोलापूरची चिमणी जमीनदोस्त करण्यात आली आहे. या घटनेची सर्वत्र चर्चा होत आहे. ही चिमणी का पाडण्यात आली? कारणं काय? स्थानिकांची मतं काय? चिमणी पाडल्याचं आम्हाला अतीव दुःख..., असं कोण म्हणालं? वाचा सविस्तर...
काँग्रेसच्या मांडीवर आम्ही जन्मलो. इथेच वाढलो, खेळलो, काँग्रेसला सोडून बिलकुल जाणार नाही, असं माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी स्पष्ट केलं. निवडणुकीनंतर सुशीलकुमार शिंदे भाजपमध्ये जाणार असल्याचं विधान प्रकाश आंबेडकर यांनी केलं होतं. त्यावर शिंदे यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली.
"शिवसेना सोबत होती म्हणून तुम्ही त्या तक्तावर बसला. आता सोबत नाही म्हणून तुम्ही बसू शकत नाही. बसू देणार नाही. संकटकाळी मदत करणाऱ्या शिवसेनेला नकली सेना म्हणता. भाजपची भेकड पार्टी झाली आहे. टरबुजाचे काय करायचं तुम्हाला माहिती आहे. जे टरबूज असते ते उन्हाळ्यात कामी येतं हे तसं नाही", अशी खोचक टीका उद्धव ठाकरेंनी केली.