Mahadev Jankar | ओबीसींना आरक्षण मिळू द्यायचं नाही ही काँग्रेस आणि भाजपची भूमिका : महादेव जानकर

| Updated on: Dec 31, 2021 | 8:38 PM

ओबीसी आरक्षणावरून महादेव जानकर यांनी काँग्रेस आणि भाजपवर थेट आरोप केला आहे. ओबीसींना आरक्षण मिळू द्यायचं नाही ही काँग्रेस आणि भाजपची भूमिका आहे असे महादेव जानकर म्हणाले आहेत.

पुणे : राज्यात सध्या नगरपंचायती आणि महापालिका निवडणुकांचे बिगूल वाजले असताना ओबीसी आरक्षणावरून जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. आधी भाजपच्या साथीने चालणारे रासप नेते महादेव जानकर आता महाविकास आघाडी सरकारचे कौतुक करू लागल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तर दुसरीकडे जानकरांनी भाजप आणि काँग्रेसवर ओबीसी आरक्षणावरून निशाणाही साधला आहे, तसेच त्यांनी स्वबळाचा नाराही दिला आहे. महादेव जानकरांनी पुण्यात कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला आहे. त्यामुळे आगामी निवडणुका आणखी चुरशीच्या होणार आहेत.

काँग्रेस आणि भाजपला ओबीसींना आरक्षण द्यायचे नाही

ओबीसी आरक्षणावरून महादेव जानकर यांनी काँग्रेस आणि भाजपवर थेट आरोप केला आहे. ओबीसींना आरक्षण मिळू द्यायचं नाही ही काँग्रेस आणि भाजपची भूमिका आहे असे महादेव जानकर म्हणाले आहेत. काँग्रेस आणि भाजपा एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, ओबीसी आरक्षणासाठी मी रस्त्यावर उतरणार असा इशाराही जानकरांनी दिला आहे. सुरूवातीला धनगर आरक्षणाचा प्रश्न उचलून धरणारे महादेव आता ओबीसी आरक्षणावरूनही आक्रमक झालेत, काही दिवसांपूर्वीच त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज ओबीसी असल्याचे म्हटले होते, त्यावर अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटल्या होत्या.

Published on: Dec 31, 2021 08:04 PM
Video | शिर्डीच्या साईबाबांसह करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी
Kishori Pednekar | मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांकडूनओबोरॉय मॉलची पाहणी