… म्हणून दीड वर्षांपासून वसंत मोरे यांच्या मागे, महादेव जानकर यांनी सांगितले कारण

| Updated on: Jan 28, 2023 | 10:07 AM

2014 ला लोकसभा जिंकणार आणि 100 टक्के खासदार बनणार, असा महादेव जानकर यांना विश्वास, काय म्हणाले जानकर ?

पुण्यातील जाधवर इन्स्टिट्युच्या कार्यक्रमात महादेव जानकर यांनी भाजपवर निशाणा साधत जोरदार भाषण केले. राज्यात गेल्या अडीच वर्षांपासून भाजप-शिंदे सरकार असून या सरकारचा एक मंत्रिमंडळ विस्तारही झाला. त्यात फक्त भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांना स्थान दिल्याने मित्र पक्ष नाराज आहेत. विशेष म्हणजे रासपचे नेते महादेव जानकर हे मंत्री न बनल्याने नाराज आहेत. त्यामुळे आता त्यांनी संघटना बांधणी सुरू केली आहे.

2014 ला लोकसभा जिंकणार आणि 100 टक्के खासदार बनणार, असा महादेव जानकर यांनी विश्वास व्यक्त केला. बारामती शहराने फक्त माझ्यावर प्रेम केले नाही तर आजूबाजूच्या लोकांनीही खूप प्रेम केले. गेले दीड वर्ष झाले मी वसंत मोरे यांच्या पाठीमागे आहे. त्यांचाही लहान पक्ष आहे. एकच आमदार आहे आणि माझाही एकच आमदार आहे. त्यामुळे मी त्यांच्या मागे आहे. वसंत मोरे यांनी आमदार बनावं, खासदार बनावं अशी माझी इच्छा आहे, असे जानकर म्हणाले.

Published on: Jan 28, 2023 09:33 AM
मोठी बातमी : प्राचार्यांना मारहाण, आमदार संतोष बांगर यांच्याविरोधात गुन्हा दाखल
राहुल गांधी यांच्या राजकीय प्रतिमेबद्दल शरद पवार यांचं मोठं विधान, म्हणाले…