Kolhapur | कोल्हापुरात तब्बल 2 कोटी 25 लाखांची वीजचोरी, दोघांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल

| Updated on: Feb 05, 2022 | 10:27 AM

वीजजोडणीधारक ग्राहकांनी वीजमीटरमध्ये फेरफार करून विजेच्या 9 लाख 24 हजार 359 युनिटची म्हणजेच आर्थिक स्वरूपात 2 कोटी 25 लाख रूपयांची वीजचोरी केल्याच उघड झालंय.

कोल्हापुरात तब्बल 2 कोटी 25 लाखांची वीजचोरी झाल्याचं उघड झालं आहे. महावितरणकडून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  वीजचोरी प्रकरणी महावितरणने अजय अशोक मेंडगुदले व अशोक महादेव मेंडगुदले याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कोल्हापूरातील जुना राजवाडा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. वीजजोडणीधारक ग्राहकांनी वीजमीटरमध्ये फेरफार करून विजेच्या 9 लाख 24 हजार 359 युनिटची म्हणजेच आर्थिक स्वरूपात 2 कोटी 25 लाख रूपयांची वीजचोरी केल्याच उघड झालंय.

NEET PG Exam : नीट परीक्षा लांबणीवर, 6 आठवड्यानंतर परीक्षेचं आयोजन
संत तुकाराम महाराजांच्या जन्मदिवसानिमित्त विद्युत रोषणाई