VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 2 April 2022
महाराष्ट्र हा देशाच्या आर्थिक स्थितीचा मजबूत आधार आहे. महाराष्ट्र आधार आहे हे नुसतं म्हणता येत नाही. तर ते आम्ही करून दाखवलं आहे. आजच्या प्रसंगी राजकीय बोलू नये असे संकेत आहेत. पण बोलावं लागतं. वातावरण निर्मिती सुरू आहे. महाराष्ट्रात बजबजपुरी आहे. महाराष्ट्रात असं आहे, महाराष्ट्रात तसं आहे, असं सांगितलं जातं. महाराष्ट्राची बदनामी करण्याचं षडयंत्र आणि कारस्थान उघड उघड दिसत आहे.
महाराष्ट्र हा देशाच्या आर्थिक स्थितीचा मजबूत आधार आहे. महाराष्ट्र आधार आहे हे नुसतं म्हणता येत नाही. तर ते आम्ही करून दाखवलं आहे. आजच्या प्रसंगी राजकीय बोलू नये असे संकेत आहेत. पण बोलावं लागतं. वातावरण निर्मिती सुरू आहे. महाराष्ट्रात बजबजपुरी आहे. महाराष्ट्रात असं आहे, महाराष्ट्रात तसं आहे, असं सांगितलं जातं. महाराष्ट्राची बदनामी करण्याचं षडयंत्र आणि कारस्थान उघड उघड दिसत आहे. महाराष्ट्र द्वेष्ट्यांना सांगायचं आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेला महाराष्ट्र जो आधार देतोय, महाराष्ट्राचं योगदान जर बाजूला ठेवलं तर कदाचित तर देशाच्या अर्थव्यवस्थेला धक्का लागू शकतो, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला. महाराष्ट्र प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर राहिलं आहे. महाराष्ट्राची बदनामी करू नका, असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी आज केलं.