VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 1 PM | 22 March 2022
जनाब सेनाबद्दलचं देवेंद्र फडवणीस यांचं वक्तव्य निंदनीय असून आम्ही त्याचा धिक्कार करतो. महाविकास आघाडी सरकाच्या यशामुळे देवेंद्र फडणवीसांचा थयथयाट होत असून 2029 पर्यंत तरी तो सुरुच राहील, असं वक्तव्य शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी औरंगाबादमध्ये केलं.
जनाब सेनाबद्दलचं देवेंद्र फडवणीस यांचं वक्तव्य निंदनीय असून आम्ही त्याचा धिक्कार करतो. महाविकास आघाडी सरकाच्या यशामुळे देवेंद्र फडणवीसांचा थयथयाट होत असून 2029 पर्यंत तरी तो सुरुच राहील, असं वक्तव्य शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी औरंगाबादमध्ये केलं. तसेच भाजपविरोधात लढण्यासाठी आम्हाला एमआयएमची गरज नाही, असंही खासदार राऊत यांनी औरंगाबादेत ठणकावून सांगितलं. शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानाला नुकतीच सुरुवात झाली आहे. विदर्भ तसेच मराठवाड्यातील प्रमुख जिल्ह्यांमध्ये शिवसेनेचे खासदार आणि आमदार यांचे दौरे आयोजित करण्यात आले आहेत. याद्वारे महाविकास आघाडी सरकारची कामं लोकांपर्यंत पोहोचवणे आणि पक्ष संघटन मजबूत करणे हा शिवसेनेचा उद्देश आहे.