VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 12 October 2021
क्रूज पार्टी ड्रग्ज प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी थेट नार्कोटिक कंट्रोल ब्युरो अर्थात NCB ला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं आहे. ही छापेमारी पूर्वनियोजित आणि बनावट असल्याचा दावा मलिक यांनी केला आहे.
क्रूज पार्टी ड्रग्ज प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी थेट नार्कोटिक कंट्रोल ब्युरो अर्थात NCB ला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं आहे. ही छापेमारी पूर्वनियोजित आणि बनावट असल्याचा दावा मलिक यांनी केला आहे. इतकंच नाही तर NCB अधिकारी समीर वानखेडे हे भाजप नेत्यांच्या संपर्कात होते, त्यानुसार त्यांनी कारवाई केल्याचा आरोप केला होता. आता तर नवाब मलिक हे भाजप युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष मोहित कुंबोज आणि समीर वानखेडे यांच्या कथित भेटीचा व्हिडीओ जारी करणार आहेत. तर दुसरीकडे या प्रकरणासंदर्भात मोहित कंबोज यांनी मंत्री नवाब मलिक यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे..