VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 10 AM | 2 February 2022
राज्यातील महत्त्वाची महापालिका म्हणून पुणे महानगरपालिकेची (Pune Municipal Corporation) ओळख आहे. पुणे महापालिकेत गेल्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर तब्बल 34 ग्रामपंचायंतीचा समावेश करण्यात आला आहे. या नव्या गावांचा समावेश पालिकेत केल्यानं त्यांच्या विकासाची जबाबदारी पुणे महापालिकेवर आलेली आहे.
राज्यातील महत्त्वाची महापालिका म्हणून पुणे महानगरपालिकेची (Pune Municipal Corporation) ओळख आहे. पुणे महापालिकेत गेल्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर तब्बल 34 ग्रामपंचायंतीचा समावेश करण्यात आला आहे. या नव्या गावांचा समावेश पालिकेत केल्यानं त्यांच्या विकासाची जबाबदारी पुणे महापालिकेवर आलेली आहे. राज्यात सध्या महापालिका निवडणुकांचं (Municipal Corporation Election) वारं सुरु आहे. पुणे महापालिकेची प्रभागरचना काल जाहीर झाली आहे. या प्रभागरचनेत नव्यानं समाविष्ट झालेल्या गावांसंदर्भात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. पुणे (Pune) महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांच्या हाती सत्तेची चावी गेली आहे.