VIDEO | MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 2 May 2022
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबादेतील सभेतून पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. शरद पवार यांनी जातीपातीचं राजकारण केलं असा पुनरुच्चार राज यांनी केलाय. तसंच राष्ट्रवादीच्या जन्मानंतर महाराष्ट्रात जातीपातीचं राजकारण मोठ्या प्रमाणात सुरु झालं, असा गंभीर आरोप राज ठाकरेंनी केलाय.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबादेतील सभेतून पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. शरद पवार यांनी जातीपातीचं राजकारण केलं असा पुनरुच्चार राज यांनी केलाय. तसंच राष्ट्रवादीच्या जन्मानंतर महाराष्ट्रात जातीपातीचं राजकारण मोठ्या प्रमाणात सुरु झालं, असा गंभीर आरोप राज ठाकरेंनी केलाय. तसंच ज्या माणसाने छत्रपती शिवाजी महाराजांची किर्ती महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण जगात पसरवली त्या बाबासाहेब पुरंदरे यांच्या वृद्धापकाळात पवारसाहेबांनी त्यांना त्रास द्यायला सुरुवात केली, असा गंभीर आरोप राज ठाकरे यांनी केलाय. तसंच रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी लोकमान्य टिळकांनी बांधली. त्या लोकमान्य टिळकांना आता तुम्ही ब्राह्मण म्हणून बघणार आहात का? असा सवाल राज ठाकरे यांनी विचारलाय.