VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 12.30 PM | 17 October 2021
भाजपच्या राष्ट्रीय सचिव आणि माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे दिल्लीसाठी रवाना झाल्या आहेत. भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या भेटीसाठी त्या दिल्लीवारीवर जात आहेत. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी पंकजा मुंडे या लहान नेत्या आहेत.
भाजपच्या राष्ट्रीय सचिव आणि माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे दिल्लीसाठी रवाना झाल्या आहेत. भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या भेटीसाठी त्या दिल्लीवारीवर जात आहेत. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी पंकजा मुंडे या लहान नेत्या आहेत. त्यांच्या वक्तव्यावर मी भाष्य करणार नाही असं म्हटलं होतं. त्याबाबत पत्रकारांनी विचारलं असता, पंकजा मुंडे यांनी ते जर तसं म्हणाले असतील तर त्याने मी लहान होत नाही आणि मोठीही होत नाही. मी आहे तशी आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलीय.