VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 12.30 PM | 8 July 2021
राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे चौकशीसाठी ईडी कार्यालयात दाखल झाले आहेत. गेल्या एका तासापासून त्याची चाैकशी सुरू आहे. ईडीच्या चौकशीला जाण्यापूर्वी खडसेंनी मीडियाशी संवाद साधला.
राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे चौकशीसाठी ईडी कार्यालयात दाखल झाले आहेत. गेल्या एका तासापासून त्याची चाैकशी सुरू आहे. ईडीच्या चौकशीला जाण्यापूर्वी खडसेंनी मीडियाशी संवाद साधला. माझ्यावरील कारवायांमागे राजकीय सुडाचा वास आहे, मी भाजप सोडून राष्ट्रवादीत आल्यानेच माझ्यावर चौकशी सुरू आहे, असा आरोप एकनाथ खडसे यांनी केला आहे.
भाजपसोडून राष्ट्रवादीत आलो. त्यानंतर माझ्या चौकश्या सुरू झाल्या. राजकीय हेतूने ही कारवाई सुरू आहे. नाथाभाऊंना छळण्यासाठीचं हे षडयंत्र सुरू आहे, असं सांगतानाच जळगावमध्ये व्हॉट्सअॅपवर भाजप कार्यकर्त्यांच्या ग्रुपवर अभी कुछ होनेवाला है असा मेसेज फिरत आहे. यातून हे सर्व राजकीय हेतूने प्रेरित असल्याचं दिसून येत आहे. पण मी कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहे, असं खडसे म्हणाले.