VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 12.30 PM | 9 February 2022
भाजपचे नेते, आमदार नितेश राणे (nitesh rane) यांची प्रकृती अचानक बिघडली आहे. त्यांना मध्यरात्रीपासून उलट्यांचा त्रास सुरू झाला आहे. त्यामुळे त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यात येत आहेत. नितेश राणे यांनी यापूर्वी छातीत दुखत असल्याची तक्रार केली होती. तसेच त्यांचा रक्तदाबही वाढला होता.
भाजपचे नेते, आमदार नितेश राणे (nitesh rane) यांची प्रकृती अचानक बिघडली आहे. त्यांना मध्यरात्रीपासून उलट्यांचा त्रास सुरू झाला आहे. त्यामुळे त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यात येत आहेत. नितेश राणे यांनी यापूर्वी छातीत दुखत असल्याची तक्रार केली होती. तसेच त्यांचा रक्तदाबही वाढला होता. मात्र, सिंधुदुर्गातील ओरोस येथील रुग्णालयात हृदयरोग तज्ज्ञ नसल्याने त्यांना तातडीने ओरोस येथून कोल्हापुरातील ( रुग्णालयात आणण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच त्यांना मध्यरात्रीपासून उलट्यांचा त्रास सुरू झाला. रात्रभरात त्यांनी तीन वेळी उलट्या केल्याने त्यांच्यावर तातडीने उपचार केले जात आहेत. नितेश यांना उलट्यांचा त्रास नेमका कशामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झालं नाही.