VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 10 April 2022
मनसे नेते वसंत मोरे यांच्या मेसेजला राज ठाकरे यांनी रिप्लाय दिला आहे. सोमवारी सकाळी 11.30 वाजता वसंत मोरेंना राज ठाकरे यांनी शिवतीर्थावर बोलावले आहे. सोमवारी सकाळी 7 वाजता मोरे पुण्याहून निघणार आहेत. दरम्यान, मोरेंना राज्यमंत्री बच्चू कडू यांचाही फोन आला होता. यावेळी आपण मनसेतच असून उद्या म्हणजेच सोमवारी राज ठाकरेंना भेटणार असल्याचे सांगितले आहे.
मनसे नेते वसंत मोरे यांच्या मेसेजला राज ठाकरे यांनी रिप्लाय दिला आहे. सोमवारी सकाळी 11.30 वाजता वसंत मोरेंना राज ठाकरे यांनी शिवतीर्थावर बोलावले आहे. सोमवारी सकाळी 7 वाजता मोरे पुण्याहून निघणार आहेत. दरम्यान, मोरेंना राज्यमंत्री बच्चू कडू यांचाही फोन आला होता. यावेळी आपण मनसेतच असून उद्या म्हणजेच सोमवारी राज ठाकरेंना भेटणार असल्याचे सांगितले आहे. वसंत मोरे गेल्या पाच सहा दिवसांपासून जास्तच चर्चेत आहेत. वसंत मोरे यांना पुणे मनसे अध्यक्षपदावरून हटवले असले, तरी त्यांनी मनसेत राहण्याची इच्छा उघडपणे बोलून दाखवली आहे. मात्र त्यांना गेल्या पाच सहा दिवसांपासून सर्वच राजकीय पक्षांकडून ऑफर येत आहेत. अनेक नेत्यांनी तर वसंत मोरे आले तर त्यांचे स्वागत आहे, असे थेट बोलून दाखवले आहे.