VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 12 PM | 11 July 2021

| Updated on: Jul 11, 2021 | 1:01 PM

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुण्यात आले होते. त्यांच्या हस्ते पुण्यातील शहर कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी हा सवाल केला. खूप पूर्वी मराठा मोर्चा निघाला होता.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुण्यात आले होते. त्यांच्या हस्ते पुण्यातील शहर कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी हा सवाल केला. खूप पूर्वी मराठा मोर्चा निघाला होता. त्यावेळी काँग्रेस, शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मोर्चेकऱ्यांची भेट घेतली होती. त्यावेळी सर्वांना आरक्षण मान्य होतं. जर सर्वांनाच आरक्षण मान्य होतं तर अडलं कुठे? की केवळ इश्यू करायचा आहे?Raj Thackeray

मराठा तरुणांची निव्वळ डोकी भडकवायची आहे का?, असा सवाल राज यांनी केला. जे मराठा आरक्षणाच्या बाबतीत आहे. तेच ओबीसी आरक्षणाबाबत आहे. ओबीसींचं आरक्षणही सर्वांना मान्य आहे तर अडलं कुठे? तुम्ही कोर्टात आरक्षणाची बाजू व्यवस्थित का मांडत नाहीत? एकमेकांकडे बोट का दाखवत आहात? एकदा या सर्वांना एका व्यासपीठावर आणा आणि विचारा, असं ते म्हणाले.

VIDEO : Raj Thackeray Live | सगळ्यांना आरक्षण मान्य तर मग अडलं कुठे ? : राज ठाकरे
VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 1 PM | 11 July 2021