VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 12 PM | 15 June 2022
जालन्यात भाजपतर्फे जलाक्रोश मोर्चा काढण्यात येत आहे. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस या आंदोलनासाठी उपस्थित असणार आहेत. शहरातील प्रमुख दोन जलाशय आहेत, याद्वारे संपूर्ण शहारामध्ये पाणीपुरवठा केला जातो. मात्र, गेल्या काही दिवसांपासून जालना शहरामध्ये सतत पाणीटंचाईची समस्या निर्माण होते आहे.
जालन्यात भाजपतर्फे जलाक्रोश मोर्चा काढण्यात येत आहे. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस या आंदोलनासाठी उपस्थित असणार आहेत. शहरातील प्रमुख दोन जलाशय आहेत, याद्वारे संपूर्ण शहारामध्ये पाणीपुरवठा केला जातो. मात्र, गेल्या काही दिवसांपासून जालना शहरामध्ये सतत पाणीटंचाईची समस्या निर्माण होते आहे. शहरवासियांना किमान आठ दिवसातून दोनदा पाणी मिळावे, याच मागणीसाठी भाजपतर्फे हा जलाक्रोश मोर्चा काढण्यात येत आहे. जालन्यातील या मोर्चाची जय्यत तयारी गेल्या काही दिवसांपासूनच सुरू आहे. देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत भाजपातर्फे हा मोर्चा काढण्यात येत आहे. जालन्यातल्या मामा चौकात सकाळपासूनच भाजप कार्यकर्ते जमायला सुरुवात झाली होती. सकाळी 11 वाजेनंतर शेकडो कार्यकर्ते आणि सामान्य नागरिकांनी या मोर्चात सहभाग नोंदवत पालिका प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली.