VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 12 PM | 18 August 2021
आठ लाखांच्या लाच प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी शिक्षणाधिकारी वैशाली वीर-झनकर जिल्हा रुग्णालयात दाखल झाल्या आहेत. छातीत दुखत असल्याचं कारण सांगून त्या रुग्णालयात अॅडमिट झाल्या आहेत.
आठ लाखांच्या लाच प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी शिक्षणाधिकारी वैशाली वीर-झनकर जिल्हा रुग्णालयात दाखल झाल्या आहेत. छातीत दुखत असल्याचं कारण सांगून त्या रुग्णालयात अॅडमिट झाल्या आहेत. शिक्षण संस्थेच्या सरकारी अनुदानला मंजुरी देण्यासाठी 8 लाख रुपयांची लाच घेताना नाशिकच्या शिक्षणाधिकारी वैशाली वीर झनकर पकडल्या गेल्या आहेत. याआधी वैशाली वीर-झनकर यांच्या चार दिवसांच्या पोलीस कोठडीपैकी दोन दिवस त्यांचा मुक्काम रुग्णालयात होता. आता अंतरिम जामीन अर्ज फेटाळून कारागृहात रवानगी करण्याचे आदेश मिळताच वैशाली वीर यांच्या छातीत ‘कळ’ आली. त्यामुळे त्या आज पुन्हा रुग्णालयात दाखल झाल्या आहेत.