VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 12 PM | 18 November 2021
बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव डेपोतील एका एसटी कर्मचाऱ्यानं नैराश्यातून विष प्राशन केलं होतं. विशाल अंबलकर या एसटी कर्मचाऱ्याचं अकोला येथे उपचारादरम्यान निधन झालं आहे. तर, सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी एसटी कर्मचाऱ्यांना आत्महत्या न करण्याचं आवाहन केलं आहे.
एसटी महामंडळाच्या राज्य सरकारमधील विलिनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचारी संपावर गेलेले आहेत. संपावर तोडगा निघत नसल्यानं एसटी कर्मचाऱ्यांमधील अस्वस्थता वाढत आहे. बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव डेपोतील एका एसटी कर्मचाऱ्यानं नैराश्यातून विष प्राशन केलं होतं. विशाल अंबलकर या एसटी कर्मचाऱ्याचं अकोला येथे उपचारादरम्यान निधन झालं आहे. तर, सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी एसटी कर्मचाऱ्यांना आत्महत्या न करण्याचं आवाहन केलं आहे. राज्यात एसटी कर्मचार्यांच्या संप सुरु असून राज्य सरकार आणि कर्मचाऱ्यांमध्ये अद्याप पर्यंत कुठलाही तोडगा या संपाबाबत निघालेला नाही. आता कर्मचारी आत्महत्येच्या दिशेने वळत असल्याचे दिसून येत आहे. एसटी विभागाने कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे धोरण अवलंबत अनेक कर्मचाऱ्यांना निलंबित केले होते.